प्रशस्तिपत्र

प्रशस्तिपत्र

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माझ्यासाठी आयुष्य सावरणारी बँक आहे. पडत्या काळात पीक कर्ज देऊन माझ्या शेतीला नवा आयाम देण्यात या बँकेचा महत्त्वाचा वाटा आहे. माझी बँक, औरंगाबाद जिल्हा बँक.

- स्वप्नील दुधलकर, पैठण, जि. औरंगाबाद

ग्राहक

माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज माझ्यासाठी प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारी बँक आहे. कमी व्याजदरात प्रत्येक स्वप्न पूर्ण करणाऱ्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला माझे प्राधान्य आहे.

- पियूष चौधरी, कन्नड, जि. औरंगाबाद

ग्राहक

आपले चार चाकी वाहनाचे स्वप्न होते. पगार जेमतेम आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आकर्षक व्याज दर देत अगदी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले. धन्यवाद एडीसीसी बँक.

- गजेंद्र चंद्रशेखर, वैजापूर, जि. औरंगाबाद

ग्राहक

मध्यमवर्गीय, सामान्य माणसांच्या हक्काची बँक म्हणजे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आकर्षक ठेव योजना, ठेवींवर आकर्षक व्याज दर, प्रत्येक व्यक्तीला परवडेल, अशा सोप्या पद्धतीने कर्ज देणारी एकमेव बँक म्हणजे औरंगाबाद जिल्हा बँक. आपणही लाभ घ्या.

- गौरव बिसने, गंगापूर, जि. औरंगाबाद

ग्राहक

कर्ज म्हटले की कागदांची पूर्तता करण्यातच अर्धे श्रम खर्ची होतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने कर्जासाठी अगदी सोपी पद्धत अवलंबिली आहे. ही पद्धत सामान्य माणसाला कुठलाही त्रास न होऊ देता कर्ज मिळवून देणारी आहे.

- राजे देवेंद्र उईके, ।फुलंब्री, जि. औरंगाबाद

ग्राहक

आपत्तीकाळात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहणारी बँक, सर्वसामान्यांचे घराचे आणि वाहनाचे स्वप्न पूर्ण करणारी बँक, ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याज दर देऊन भविष्य सुरक्षित करणारी बँक म्हणजेच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

- मुकेश गणोरकर (युवा शेतकरी), खुलताबाद, जि. औरंगाबाद

ग्राहक